गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरणोली येथील रहिवासी झाडीपट्टी चे कलावंत डॉ परशुराम खुणे याना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे , इतक्या प्रतिष्ठेचा पुरस्कार गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील कलावंताला भेटणे ही नक्कीच जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे, डॉ परशुराम खुणे यांनी आजपर्यंत 5000 च्या वर नाट्यप्रयोग केलेले असून त्यात 800 च्या वर विविध भूमिका साकारल्या आहेत, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान पीक निघाल्यानंतर हिवाळ्यात झाडीपट्टी चे नाटक गावोगावी होत असतात,या भागात कोहळी नावाचा समाज वास्तव्यास असून या समाजाला नाट्य आयोजन, अभिनय याचा प्रचंड छंद आहे, डॉ खुणे हे त्याच कोहळी समाजाचे आहेत, या चळवळीला झालीवूड नाव आले असून यात सिजन मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते, यात हजारो लोकांना , कलावंतांना रोजगार मिळत असते, ही झाडीपट्टी राबवण्यात डॉ खुणे यांचा सिहांचा वाटा आहे, पहिल्यांदाच झाद्दीपट्टी ची दखल इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी झाली असून गडचिरोली सारख्या अतिदुर्गम जिल्ह्याला गौरव प्राप्त झाले आहे, जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डॉ परशुराम खुणे यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे
अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील डॉ परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES