Saturday, December 7, 2024
Homeमूलअधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी गडचिरोली पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर

अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी गडचिरोली पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर

गडचिरोली.:- राज्य शासनाने नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी जेष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांची नियुक्ती केली आहे.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी “महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम, २००७ ( वितरण व नियंत्रण) शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले सदरहु नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार समितीमधील सदस्यांची पात्रता व अनुभव लक्षात घेऊन नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीवर दैनिक पुण्यनगरी चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल अनेक पत्रकार मित्रांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments