Thursday, February 22, 2024
Homeमूलअभाविप चे दोन दिवशीय अभ्यासवर्ग मुल शहरात*

अभाविप चे दोन दिवशीय अभ्यासवर्ग मुल शहरात*

मुल तालुका प्रतिनिधी:-
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रह्मपुरी जिल्ह्याचे कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यास वर्ग दिनांक १ व २ डिसेंबर 2023 रोजी योग भवन क्रीडा संकुलन मूल इथे घेण्याचे ठरविले आहे. संपूर्ण जिल्ह्यातून 100 विद्यार्थी व विद्यार्थिनी या वर्गात सहभागी होणार आहेत. हे वर्ग एक तारखेला सकाळी १०.०० वाजता सुरू होऊन दोन तारखेला सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे.या वर्गात विद्यार्थी परिषदेची आयाम गतिविधि कार्य व महाविद्यालयात अभावीप चे काम ,अभावीप ची कार्यपद्धती, अभावीप ची आचार पद्धती व परंपरा, अभाविप मध्ये येणारे प्रवास व त्याच्याशी संपर्क सोबतच महाविद्यालयातील अनेक विषयाला घेऊन व नवीन शैक्षणिक धोरण 2023 याबद्दल विविध सत्र विविध परिसरातील वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी या अभ्यास वर्गात जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, तळोधी, सावली, चिमूर, सिंदेवाडी, व मूल या तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग करावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रह्मपुरी तर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments