गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा गावाजवळ आज दिनांक 9 सप्टेंबर ला दुपारी गुरे चारत असताना अचानक वाघाने हल्ला करत कृष्णा ढोणे, कळमटोला या इसमाला जंगलात फरफटत नेले, त्याच्या सोबत गुरे चारणाऱ्या इतर लोकांनी सदर घटना प्रत्यक्ष बघितली, एकूण चार लोक गुरे चारायला जंगलात गेली होती, इतरांनी घटनेची माहिती गावात कळवताच वन खात्याला माहिती देत जंगलात शोध घेतला असता कृष्णा ढोणे यांचा मृतदेह सापडला, परिसरातील जंगलात वारंवार घटना घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केल्या जात आहे
अमिर्झा जवळ वाघाच्या हल्ल्यात इसम ठार
RELATED ARTICLES