अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाद्वारे विविध योजनांमार्फत नागरिकांना शिधा वाटप केल्या जाते, सणासुदीला आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत गरिबांना सण गोड वावेत म्हणूनही शिधा वाटप होतो, या योजनेचा लाभ व्यवस्थित मिळत आहे की नाही किंवा या अंतर्गत जनतेचे काय म्हणणे आहे याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडक 50 लाभार्त्यांसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः सवांद साधणार आहेत, 13 एप्रिल 2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सवांद साधणार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आढावा घेणार असल्याने तसेच जनतेला त्यांच्याशी सरळ संवाद करायला भेटणार असल्याने जनता उत्साहित आहे