आरमोरी तालुक्यात अजून वाघाचा कहर झाला असून रवी या गावाजवळ आज सकाळी एक इसमास ठार केले आहे, पुरुषोत्तम सावसाकडे वय 35 अशे या इसमाचे नाव आहे, सदर युवक हा घरच्या बकऱयांसाठी चारा आणायला गेला होता, झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करत त्याला ठार केले, सदर परिसरात वाघीण आणि तिच्या दोन बछड्याचा वावर आहे, हा हल्ला त्याच वाघिणीने केल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मागील पाच दिवसात आरमोरी तालुक्यातील वाघाने ठार केल्याची ही तिसरी घटना आहे, तालुक्यातील जनता प्रचंड दहशतीखाली असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे
आरमोरी तालुका वाघाच्या हल्ल्यात इसम ठार, पाच दिवसात तिसरी घटना
RELATED ARTICLES