Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedआरमोरी परिसरात धुमाकूळ घालणारा CT-1 वाघ अखेर जेरबंद

आरमोरी परिसरात धुमाकूळ घालणारा CT-1 वाघ अखेर जेरबंद

चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घालत अनेकांच्या नरडीचा घोट घेणारा CT-1 वाघ आज 13 ऑक्टोबर ला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून त्यामुळे नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे, मागच्या एक आठवड्यात या वाघाने तीन लोकांना ठार केले होते , परिसरात प्रचंड भीतीमय वातावरण झाल्याने या क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी वाघाला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कडे केली, सुधीरभाऊंनी ताडोबा व भंडारा वरून टीम रवाना केल्या, जंगल परिसरात वाढलेल्या झुडपी जंगलाने अनेक अडचणी आल्या, मात्र आज या टीम ला यश आले असून नरभक्षक वाघ आज पिंजऱ्यात अडकला, बघ्यांनि एकच गर्दी केली होती, जनतेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांचे आभार मानले आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments