Saturday, December 7, 2024
Homeमूलआलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांचेवर कारवाई करा

आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांचेवर कारवाई करा

गडचिरोली : आलापल्ली आणि पेरमिली वनपरिक्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर खोदकामात जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने नियमबाह्य कामे करण्यात आली असून या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी वनसंरक्षक डाॅ.किशोर मानकर यांना निवेदन देऊन केली.
सदर निवेदनानुसार, वनपरिक्षेत्राधिकारी योगेश शेरेकर यांनी मार्च २०२२ मध्ये तसेच त्यांच्या इतरही काळात आलापल्ली वनपरिक्षेत्रात तसेच त्यांच्याकडे प्रभार असताना पेरमिली वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीसारखी कामे केल्याचा आरोप करण्यात आला. यंत्राच्या सहाय्याने कामे करून बोगस मजुरांच्या नावे खोट्या स्वाक्षऱ्या करून आणि खोटे व्हाऊचर बनवून लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे वरिष्ठांची तथा शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या कामांचे अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, मजुरांचे हजेरीपट अशा सर्व मुद्द्यांची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी खुणे यांनी केली.
जिल्ह्यात वनकायद्याचा धाक दाखवून दुर्गम भागात रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे उकळल्या जाते. यातूनच अनेक रस्त्याची कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यासह अनेक सुविधा मिळत नाहीत. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतू काही अधिकारी केवळ स्वतःचा स्वार्थ साधत माया जमवत आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीची चौकशी करावी, अशीही मागणी खुणे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लोकप्रतिनिधींनाही देण्यात आली.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments