गडचिरोली:- माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे अहेरी येथील राजवाड्यात वाढदिवसानिमित्त कापलेल्या केक वर भावी खासदार अशे लिहिले होते, त्यामुळे 2024 च्या रणधुमाळी मध्ये धर्मराव बाबा रिंगणात राहतील अशे सूतोवाच केल्याचे बोलले जात आहे
20 ऑक्टोबर हा दिवस अहेरी राज परिवारातील सदस्यांसाठीच नव्हेतर जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा दिवस असतो.दरवर्षीच या दिवशी धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यंदा सुद्धा अहेरी येथील राजवाड्यात आ.धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.जिल्हाभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली.यावेळी कोरची ते सिरोंचा या बाराही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
जिल्हाभरातील कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी,अधिकारी वर्ग आणि कार्यकर्त्यांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शुभेच्छा स्वीकारले.एवढेच नव्हेतर,वाढदिवसाच्या व्यस्त कार्यक्रमात सुद्धा खेड्यापातील नागरिकांची भावना समजून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन दिलेले निवेदनही स्वीकारले.विविध समस्यांवर चर्चा करून स्वतः प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
*राज परिवारातील सदस्यांनी केक कापून केला वाढदिवस साजरा*
राज परिवार म्हटलं की,सदस्यांची संख्याही तेवढीच.दरवर्षी घरच्या सदस्यांकडून आ धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आज सकाळपासूनच वाढदिवस साजरा करण्यासाठी घरच्या सदस्यांनी तयारी केली होती. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्यावर दुपारच्या वेळी राजवाड्यात आ धर्मराव बाबा आत्राम यांचा वाढदिवस जल्लोषात आणि फटाक्यांचा आतिषबाज करून साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे या केकवर ‘भावी खासदार’ असे लिहिले होते.वाढदिवस साजरा करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,प स सदस्य हर्षवर्धन बाबा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर सामाजिक कार्यकर्ते बबलू भैय्या हकीम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष शाहीन भाभी हकीम,कृष्णराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष फहीम काझी,योगेश नांदगाये, माझी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष,कार्यकारी अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे विविध तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.