नुकतेच चंद्रपुर येथे जिल्हयातील शेतकऱ्यांना कृषि विषक नानाविध तत्रज्ञानाची माहीती होण्याचे दृष्टिने पाच दिपसीय जिल्हा GC कृषि महोत्सवाचे आयोजन चंद्रपुर कल्ब ग्राउंड , चंद्रपुर येथे जिल्हयाचे पालक मंत्री ना. सुधिरभाऊ मुंगंटीवार यांचे हस्ते उध्दधाटन करुन करण्यात आले.
सदर कृषि महोत्सवास पाचही दिवस तालुक्यातील 100 चे वर शेतकऱ्यांनी वयक्तिक , शेतकरी गटे व शेतकरी उत्पादक कंम्पणीचे माध्यमातुन सहभाग घेऊन प्रदर्शनी, खरेदी विक्री, परीसंवाद, चर्चा सत्र, पथनाटय व प्रक्षेपण यांचा लाभ घेतला. कृषि महोत्सवाचे अंतीम दिवसी समारोपिय कार्यक्रमाचे औचित्याने जिल्हयातील शेती क्षेत्रात उत्कृष्टा कार्य करणारे सावली येथील कृषी पर्यवेक्षक दिनेश पानसे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . सोबतच शेतकरी व कृषि विभागाचे कर्मचारी आणी पौष्टीक तृनधान्यांचा आहारात वापर करेल्यामुळे शंभरी ओलांडनाऱ्या जेष्ठा नागरीकांचा सत्कार जिल्हा परीषद, चंद्रपुर चे माजी अध्यक्ष .श्री. देवराजी भोंगळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहे बऱ्हाटे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्मृतीचीन्ह, प्रमाणपत्र व शाल,श्रीफळ देऊन करण्यात आले. त्यात सावली तालूक्यातली उपरी येथील मोरेश्वर निंबाजी कुनघाडकर यांचे आच्छादन व सूक्ष्म सिंचना चा वापर करुन भाजीपाल्याचे उत्तम उत्पादन घेतल्या बद्दल , व्यहाड खुर्द येथील श्री विजय कवडुजी ऊरकुडे यांचे आंबा पिकाचे फलोत्पादन पिक उत्तम प्रकारे घेत असल्याबाबत, लोंढोली येथील श्री गोपिनाथ देवाजी चौधरी यांचे संमिश्र भाजीपाला उत्पादन व भाजीपाला रोपे विक्री यातुन उत्पन्न घेतल्या बद्दल व टेकाडी येथील श्री मंगेश अशोक पोटवार यांचे सुधारीत पध्दतीने भाजीपाला पिक उत्पादन केल्याबद्दल आणी पेंढरी येथील श्निनाद दा. गड्डमवार यांचे तांत्रिक पध्दतीने मत्स ऊत्पादन करीत असल्याबददल सत्कार करण्यात आले. तसेच तालूका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि पर्यवेक्षक दिनेश रघुनाथ पानसे यांचे शेतकऱ्यांना दिलेल्या उत्कृष्ठा सेवेबद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
तालूक्यातली सत्कार करण्यात आलेल्या शेतकरी व कर्मचाऱ्यांनी तालूका कृषि अधिकारी श्रीमती अश्विनीताई गोडेस, मंडळ कृषि अधिकारी अन्नाराव वाघमारे व कृषि विभागाचे कर्मचारी यांचे मार्गदर्शनातून व प्रोत्साहनाने तंत्रज्ञानाचा वापर करीत श्रमाने यश प्राप्त केल्याचे सांगत त्यांचे व कृषि विभागाचे आभार मानले.