Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedउद्या दिनांक 7 सप्टेंबर ला सिनेट निवडणुकीचा निकाल, विजयाबद्दल दावे प्रतिदावे

उद्या दिनांक 7 सप्टेंबर ला सिनेट निवडणुकीचा निकाल, विजयाबद्दल दावे प्रतिदावे

गोंडवाना विद्यापीठाच्या द्वितीय सिनेट निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहचली असून 7 सप्टेंबर ला सकाळी 8 वाजेपासून निकालाची मतमोजणी गडचिरोली येथील स्थानिक शासकीय विज्ञान महाविद्यालयात होणार आहे, सदर निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात अभाविप, शिक्षक महाआघाडी व सेक्युलर पॅनल अश्या तीन पॅनल मध्ये लढत होती, विजयाबद्दल सर्वच संघटना दावे प्रतिदावे करत असून या निवडणुकीत उभे असलेल्या काही उत्साही उमेदवारांनी 2 ते 3 लाखापर्यंत शर्यत लावायची तयारी दाखवत आपल्या विजयाचा दावा केला, मतदान हे ओबीसी, एन टी, एस टी, एस सि, महिला प्रवर्ग अशे 5 राखीव तर सर्वसाधारण मतदारसंघात 5 उमेदवार अश्या 10 उमेदवारांना निवडून द्यायचे आहे, आता निकालाचे काऊंट डाउन सुरू झाले असून लवकरच मतमोजणीला सुरवात होणार असली तरी मागच्या निवडणुकीचा अंदाज बघता संपूर्ण निकाल हाती पडायला मात्र 8 तारखेचा सूर्य बघावं लागेल असे वाटते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments