Thursday, October 10, 2024
Homeमूलउपायुक्त वाकुडकरांनी केलं शेकडो पालकांना " टेशन फ़ी ".-ऑन स्पॉट जातपडताळणी प्रमाणपत्र

उपायुक्त वाकुडकरांनी केलं शेकडो पालकांना ” टेशन फ़ी “.-ऑन स्पॉट जातपडताळणी प्रमाणपत्र

चंद़पूर :- समाजकल्याण उपायुक्त वाकुडकर यांनी स्वत कनिष्ट महाविद्यालयात येऊन ऑनलाईन केलेल्या प्रस्तावाचे ऑनलाईन निरीक्षण करून तिथेच जात पळताळणी प़माणपत्र विद्याथी
यांना वाटपाचा करून तालुक्यातील शेकडो पालकांना मोठे सुख व् समाधान दिले.
तालुक्यात सवांत मोठे कनिष्ट विज्ञान महाविद्यालय असलेल्या नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात समाजकल्याण उपायुक्त वाकुडकरांनी
तब्बल 80 विद्यार्थ्याना स्वहस्ते जात पळताळणी प़माणपत्र वाटप केले. जात पडताळणी प़माणपत्र ही विज्ञान विषयासह सवं विदयार्थ्यांना आवश्यक बाब आहे. विद्याथी यांंचेपेक्षा मोठया प्रमाणावर पालकांना
त्रासदायक असलेल्या या बाबीची दखल घेऊन प़त्यक्ष उपायुक्त वाकुडकरानी हजेरी लावून सवांना “टेंशन फ्री” केले. ज्या विद्याथींचे प्रस्तवात त्रुटी आढळल्या त्यांंना सहजपणे निर्देश देऊन मार्ग मोकळा करून दिला.
याप्रसंगी नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडें,
प्रा.महेश पानसे, प्रा.विजय काटकर, प्रा.
सुनील कामडी, प्रा.पुस्तोडे, प्रा.सौ.उगेमुगे उपस्थित होते.
हा पायंडा संपुर्ण राज्यात राबवावा ही पालकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments