आज गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ च्या दिशांत समारोहात सहभागी होण्यासाठी केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष मान हंसराज भय्या अहिर आले होते, समारंभानंतर ओबीसी बांधवांच्या विनंतीनुसार भय्या स्थानी सर्किट हाऊस ला थांबले, सदर ओबीसी समाजाच्या बैठकीत कोहळी समाजाच्या शिष्टमंडळाने हंसराज अहिर यांचे समोर समाजाची एक समस्या विशद करत निवेदन दिले प्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, यांची उपस्थिती होती,कोहळी समाज ओबीसी मध्ये आल्यापासून महाराष्ट्रातील पोर्टल मध्ये कुठलेही फॉर्म भरताना अनु क्रमांक 315 ला तर केंद्रीय विद्यालय किंवा केंद्राच्या इतर जागी फॉर्म भरताना पोर्टल अनु क्रमांक 221 वर आहे , पण अस लक्षात आलं आहे की केंद्रात काही ठिकाणी फॉर्म भरताना पोर्टल मध्ये कोहळी समाजाची नोंद दिसत नाही, त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, सदर समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोहळी समाज विकास मंडळ, नागपूर चे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश बालबुद्धे यांचे सहीने निवेदन देण्यात आले, शिष्टमंडळात कोहळी समाज मंडळ चे संचालक ओमप्रकाश संग्रामे, गडचिरोली अध्यक्ष खुशाल म्हस्के, भाजप उपाध्यक्ष प्रणय खुणे,किशोर कापगते, सुनील देशमुख, नांमदेव खुणे, प्रा यादव गहाने, विलास सोनावणे, राहुल झोड व इतर सदस्य उपस्थित होते