कोहळी समाज विकास मंडळ* नागपूर च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी *कोहळी पाटील प्रतिष्ठा पॅनल* चे गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे *सदस्य पदाचे उमेदवार श्री ओमप्रकाश संग्रामे* व *KP पॅनलच्या प्रचाराचा नारळ हनुमान मंदिर (सेमाना) गडचिरोली येथे फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला*
*यावेळी कोहळी समाज गडचिरोलीचे अध्यक्ष श्री खुशालजी मस्के, कोषाध्यक्ष श्री सुनीलजी देशमुख, प्रा. विलास खुणे, विनोद गोबाडे, श्रावणजी पाटील कापगते, प्रा. यादव गहाणे घनश्यामजी परशुरामकर, कवडूजी बोरकर, रोशन संग्रामे हे प्रामुख्याने उपस्थित होते*
*गडचिरोली येथे प्रचारानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, राजोली ,सिंदेवाही या ठिकाणी प्रचार करण्यात आले*
*कोहळी समाज विकास मंडळ च्या माध्यमातून समाजाचा विकास घडून यावा यासाठी कोहळी पाटील प्रतिष्ठा पॅनललाच आम्ही मतदान करणार, कोहळी पाटील प्रतिष्ठा पॅनल यांनी सर्व जिल्ह्यांना प्रतिनिधित्व दिले आहे हीच सर्वसमावेशक पॅनल आहे असे मत सामान्य सभासद यांनी व्यक्त केले*