दिनांक २२ जानेवारी २०२३ रोज रविवारला कोहळी समाज गडचिरोली तर्फ़े २५ वा रौप्य महोत्सवी वार्षिक स्नेहमिलन मेळावा गड़चिरोलीचे आराध्य दैवत श्री सेमाना देव मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष से.नि. प्राचार्य ते.क. कापगते मूल,प्रमुख पाहुणे सर्व श्री किशोरजी पर्वते पोलिस निरीक्षक नागपुर,श्री महादेवजी कापगते माजी शिक्षण उपसंचालक,श्री बोरकर साहेब पशुवैद्यकीय अधिकारी नागपुर,श्री स्वप्निल गौपाले साहेब पोलिस उपनिरीक्षक चंद्रपुर, डॉ श्री छगनजी पर्वते ब्रम्हपुरी,डॉ श्री जयंतजी पर्वते ब्रम्हपुरी,श्री मनीषजी पर्वते ब्रम्हपुरी,श्री रेशिमजी झोड़े अध्यक्ष कोहळी समाज राजोलि आदि लाभले होते. समाजाचा २५ वा वर्धापनदिनच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवारांचे स्वागत व अध्यक्ष प्राचार्य ते.क. कापगते यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.कोहळी समाज गड़चिरोलीचे अध्यक्ष श्री खुशाल मस्के सर गडचिरोली यांनी प्रस्तावना सांगितली आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली सोबतच कोहळी समाज गडचिरोली येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सलग २५ वर्षे अध्य्क्ष म्हणून समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे श्री खुशालजी मस्के सर आणि कोषाध्यक्ष श्री सुनीलजी देशमुख सर यांचा समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी समाजातील महिलांचा वानाचा कार्यक्रम पण आयोजित केला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा यादव गहाणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री सुनील देशमुख सर यांनी केले.
कोहळी समाज गडचिरोली रौप्य महोत्सवी स्नेहमीलन सोहळा संपन्न
RELATED ARTICLES