Thursday, February 22, 2024
Homeमूलगडचिरोली-चिमूर लोकसभा राकाच्या कोट्यात ? धर्मरावबाबा लागले कामाला

गडचिरोली-चिमूर लोकसभा राकाच्या कोट्यात ? धर्मरावबाबा लागले कामाला

येणारी लोकसभा निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-ठाकरे गट शिवसेना हे एकत्रित लढून बलाढ्य भाजप-शिवसेनेचा महाराष्ट्रात सामना करणार आहेत, मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हे विदर्भात पाय पसरू बघत आहे, शरद पवारांनी यासाठी अनेक प्रयत्न केले, यवतमाळ जिल्ह्यात एक मुस्लिम युवकाला , नागपूर येथील एक दलित नेत्याला एम एल सि दिली, मागे अनिल देशमुखांना थेट गृहमंत्री पद, प्रफ्फुल पटेलांना सतत ताकद,नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन दलित मतांना आकर्षित करणे अशे अनेक प्रयोग झाले, पण राष्ट्रवादी काँग्रेस ने विदर्भात काही पाय रोवला नाही, एकेकाळी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँक,चंद्रपूर जिल्हा परिषद, चंद्रपूर-वरोरा-राजुरा येथे थेट नगराध्यक्ष, काही पंचायत समित्या अशे सत्ताकेंद्र बाबासाहेब वासाडे यांच्या नेतृत्वात होते पण गटबाजीचे व विषमतेचे जंतू उत्पन्न होत सर्वच गमावून बसले, गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा तिन्ही विधानसभेत पूर्वी राष्ट्रवादी चा जोर होता, पालकमंत्री आर आर पाटील असताना तर हा पक्ष सर्वोच्च होता पण सध्या तो जोर ओसरत अहेरी मतदार संघात उरल्याचे चित्र आहे,आता राष्ट्रवादी काँग्रेस नवीन प्रयोग करायला बघत असून आमदार धर्मराव बाबा आत्राम या आदिवासी नेत्याला गडचिरोली चिमूर मतदारसंघाची तिकीट देऊन आम्ही आदिवासी समाजाच्या सोबत आहोत हा मेसज देत विदर्भात पाय मजबूत करू बघत आहे, धर्मराव बाबांना हिरवी झेंडी भेटल्याची जोरदार चर्चा असून बाबांनी भेटीगाठी करत ब्रम्हपुरी व चिमूर विधानसभेत काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठकी पण झाल्याची माहिती आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पण गडचिरोली जिल्ह्यात युवा नेतृत्व त्यांचे विश्वासु महेंद्र ब्राह्मणवाडे यांचेकडे पक्षाची धुरा देत चांगली मोर्चेबांधणी केली आहे, दोनदा पराभव झाल्याने यावेळेस सहानभूती भेटेल व हा गड सर होईल अशी आशा काँग्रेस ला आहे, त्यामुळे काँग्रेस सुद्धा हा मतदारसंघ सहजासहजी सोडायला तयार नाही, पण यापूर्वी चिमूर मतदारसंघात प्रफ्फुल पटेल यांनी निवडणूक लढवली आहे,ब्रम्हपुरी मतदारसंघात दामोदर मिसार यांनी राकाच्या तिकिटावर घेतलेली लक्षणीय मते, या लोकसभा मतदारसंघात ओबीसी समाजाची लक्षणीय वोट, आमगाव मतदरसंघ हा भंडारा जिल्ह्यात असल्याने तेथील प्रफ्फुल पटेल यांचा प्रभाव, विजनवासात असलेले नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार,माजी आमदार हरिराम वरखेडे, ऍड बाबासाहेब वासाडे यांना पुनरजिवीत करून त्यांच्या अनुभवी संपरकाचा फायदा घेता येईल हा विश्वास अशे अनेक विषय लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसने हि तयारी चालवली आहे, वेळ आली तर भंडारा लोकसभेत सातत्याने होत असलेला पराभव लक्षात घेऊन प्रफ्फुल पटेल हे निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवतील व तिथे काँग्रेस ला सीट देऊन हा मतदारसंघ घेऊन इकडे ताकत लावतील असा अंदाज आहे, या सर्व घडामोडी वर शरद पवार हे स्वता लक्ष ठेवून असल्याने गडचिरोली मतदार संघात घड्याळाची टिकटिक ही भाजप विरुद्ध लढेल असा अंदाज आहे, परंतु या लोकसभेत भाजपने आपली ताकत वाढवली असून परंपरागत भाजप वोट बँक इथे आहे, येथील ओ बी सी समाज सध्या भाजपच्या पाठीशी दिसतंय, सहा पैकी तीन विधानसभा हे भाजपकडे आहेत,तशेच खासदार अशोक नेते हे तिसऱ्यांदा निवडून आल्यास डायरेक्ट मंत्रीच बनतील असा विश्वास जनतेत आहे त्यामुळे भाजपचा कमळ फुलेल की घड्याळाची टिक टिक तग धरेल हे येणारा काळच सांगणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments