Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedगडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात हत्ती डेरेदाखल

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात हत्ती डेरेदाखल

मागील 2 ते 3 वर्षांपासून छत्तीसगड राज्यातील जंगलातील हत्ती चा कळप हा साधारणतः सप्टेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात येऊन डेरेदाखल होतो, आपण अनेकदा पक्षी स्थलांतर करतात अस ऐकत आलो पण सध्या हत्ती च स्थलांतर करताना दिसत आहेत, मागील वर्षी हत्तीचा कळप हा अगदी वडसा शहराच्या जवळपर्यंत आला होता, विशेष म्हणजे अनेक शेत्या व घरे या हत्तींनी उध्वस्त केले, या भागातील शेतकरी आपल्या शेतातली मोहफूल वेचून साठा करून ठेवतात व योग्य वेळ आली की विकतात, पण मागील वर्षाच्या अनुभवावरून मोहफूल च्या वासेवर हत्तींनी बरेच घर , गोठे वर नासधूस केली होती,
याहीवर्षी हा हत्तीचा कळप गडचिरोली जिल्ह्यात डेरेदाखल झाला आहे, छत्तीसगड ते धानोरा तालुका व आता लागून असलेल्या कुरखेडा तालुक्यात हा कळप आला आहे, वाघेडा- आंधळी परिसरात जनतेला हत्तीच्या कळपाचे दर्शन झाले असून वनविभागाने त्वरित बंदोबस्त करत या हतींचा बंदोबस्त करावा किंवा यांना पकडून ताडोबा च्या जंगलात नेऊन सोडावे अशी मागणी जोर धरत आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments