गोंडवाना विद्यापीठात नुकतीच सिनेट निवडणूक पार पडली असून त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 5, यंग टीचर्स पॅनल चे 4 व सेक्युलर पॅनल चा 1 उमेदवार निवडून आले होते, विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल च्या निवडणुका लवकरच होणार आहेत, त्यातच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी नवीन नऊ सिनेट सदस्यांची आपल्या कोट्यातून नियुक्ती केली आहे, यात निवडुणुकीत चांगली टक्कर देत पराभव पत्कराव्या लागलेल्या अभाविप स्वयंसेवक स्वरूप तारगे गडचिरोली व वरोरा येथील विदेशातील शिक्षणाचा दीर्घ अनुभव असणारे डॉ सागर वझे यांचा समावेश आहे, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे अध्यक्ष प्रचीत पोरेड्डीवार व चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकोऊंटं पियुष मामीडवार यांचा सुद्धा समावेश आहे, तसेच सिनेट निवडणुकीत महत्वाची भूमिका असलेल्या संजय रामगिरीवार यांना सुद्धा सिनेट मेम्बर चा मान मिळाला, या व्यतिरिक्त सिनेट निवडणुकीत सीट न मिळू शकलेल्या गडचिरोली येथील नितीन चीचघरे यांनाही हा बहुमान भेटला तसेच वर्धा येथील शशीभूषण वैद्य, चंद्रपूर येथील विजय बदकल, नागपूर येथील नितीन लाभसेटवार यांचा समावेश आहे, यादीत नाव असलेल्या सर्वांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे