नुकतेच गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्वाधिक पाच जागा जिंकत आपला करिश्मा दाखविला, सुमारे अकरा हजार च्या वर पदविधराणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता, अभाविप च्या खालोखाल शिक्षक आघाडी ने चार तर नव्यानेच उभे झालेल्या सेक्युलर पॅनल ने सर्वच मतदारसंघात उल्लेखनीय मत घेत घेत एक जागा पण जिंकली, अभाविप ने राखीव प्रवर्गात पाच पैकी तीन तर खुल्या प्रवर्गात पाच पैकी दोन जागा जिंकल्या, इतर मागासवर्गीय प्रवर्गात माजी सिनेट सदस्य तथा मुल शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील शेरकी यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यांना अभाविप चे धर्मेंद्र मूनघाटे यांनी 450 मतांच्या फरकाने धूळ चारली, अनुसूचित जाती प्रवर्गात शिक्षक आघाडीचे दीपक धोपटे यांनि अभाविप चे जयंत गौरकार यांना 250 च्या वरच्या फरकाने हरवत विजयश्री खेचून आणली, महिला प्रवर्गात अभाविप च्या सौ किरण संजय गजपुरे यांनी शिक्षक आघाडीच्या मातब्बर उमेदवार सौ विद्या शिंदे याना धूळ चारली, नागभीड सारख्या छोट्या तालुक्यातील महिला उमेदवाराने वेगवेगळ्या तालुक्यातील स्वतःच्या शैक्षणिक संस्था मधील कर्मचाऱयांना संपूर्ण ताकदीनिशी उतरवत , उमेदवार ही चंद्रपूर सारख्या भरपूर मतदार असलेल्या शहराशी संबंधित आणि जातीय समीकरणात फीट बसत असलेल्या उमेदवाराला लोळवले, त्यामुळे महिला प्रवर्गातील या लढतीची विशेष चर्चा होताना दिसत आहे,
एन टी प्रवर्गात अभाविप चे उमेदवार गुरुदास कामडी यांनी शिक्षक आघाडीचे राजेंद्र कन्नमवार यांना तब्बल 786 मतांनी हरवले, अनुसूचित जमाती प्रवर्गात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या शिक्षक आघाडीच्या तनुश्री आत्राम यांनी अभाविपच्या योगिता पेंदाम (डबले) यांना 1400 च्या फरकाने हरवत विजयी झाल्या,
खुल्या प्रवर्गात अभाविप तर्फे प्रशांत दोनतुलवार, यश बांगडे, शिक्षक आघाडीतून अजय लोंढे, दिलीप चौधरी तर सेक्युलर पॅनल मधून शिवसेना प्रणित युवा सेनेचे निलेश बेलखेडे विजयी झाले
खुल्या प्रवर्गात मातब्बर उमेदवार माजी सिनेट सदस्य गोविंद भेंडारकार यांचा पराभव झाला, संघटनेत सामान्य कार्यकर्त्यांसारखे काम करणारे अभाविपचे स्वरूप तारगे यांचा निसटता पराभव सर्वांना चटका लावून गेला, अभाविपच्या मनोज भूपाल या सामान्य कार्यकर्त्याला पहिल्या पसंतीची उल्लेखनीय मत मिळूनही पराभव पत्करावा लागला, आपले शिक्षण इंग्लंड सारख्या देशात पूर्ण करणाऱ्या व त्या शिक्षणाचा पाया गोंडवाना विद्यापीठ मध्ये वापरण्याचा मानस असलेल्या अभाविपच्या डॉ सागर वझे यांचाही पराभव अनेकांना न पचणारा ठरला, शिक्षक आघाडीच्या अजय लोंढे यांनी गडचिरोली जिल्ह्यात घेतलेल्या सर्वाधिक मतांच्या मागे त्यांनी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसत होती,एकंदरीत या निवडणुकीत अभावीपणे सर्वाधिक जागा जिंकत नक्कीच आपला प्रभाव पाडला
गोंडवाना विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात अभाविप चा बोलबाला, दिगजांचा पराभव
RELATED ARTICLES