Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedगोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक, महिला गटातून सौ किरण संजय गजपुरे यांचा प्रस्थापितांविरुद्ध...

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूक, महिला गटातून सौ किरण संजय गजपुरे यांचा प्रस्थापितांविरुद्ध उल्लेखनीय विजय

===========
गोंडवाना विद्यापीठाच्या दुसऱ्या सिनेट निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील महिला राखीव गटातुन अभाविप व शिक्षण मंच पॅनलतर्फे नागभीडच्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी विजयश्री प्राप्त केली आहे.
४ सप्टेंबर ला पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ अधिसभेच्या सिनेट सदस्य व विविध प्राधीकरणाच्या सदस्य निवडीसाठी मतदान पार पडले होते. याची मतमोजणी ७ सप्टेंबर ला सकाळी ९ वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा संपली . या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील महिला राखीव गटात नागभीडच्या सरस्वती ज्ञान मंदिर येथील सहाय्यक शिक्षिका सौ. किरण संजय गजपुरे यांनी विजय प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
अभाविप व शिक्षण मंच पॅनलचे खुल्या गटातुन यश बांगडे व प्रशांत दोंतुलवार या दोघांनी तर राखीव गटातुन प्रा. धर्मेन्द्र मुनघाटे ( ओबीसी प्रवर्ग ) , गुरुदास कामडी ( डीटी एनटी प्रवर्ग ) व सौ. किरण संजय गजपुरे ( महिला राखीव ) या तिघांनी विजय प्राप्त केला. अभाविप पॅनलने दहापैकी पाच जागा जिंकुन आपले वर्चस्व सिध्द केले आहे. नागभीडला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान प्राप्त झाला असुन मागील वेळी खुल्या प्रवर्गातुन प्रा. देवीदास चिलबुले यांनी विजय प्राप्त केला होता. सौ. किरण संजय गजपुरे यांनी या विजयाबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानले असुन विद्यापीठातील शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्मितीसाठी लक्ष केंद्रीत करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments