गडचिरोली :- स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालायत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
करण्यात आली कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालायाचे प्राचार्य संजीव गोसावी, हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे , पर्यवेक्षक अजय वानखेड़े, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार, देवेन्द्र म्हशाखेत्री हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुण दीप प्रज्वलित करण्यात आले.
प्रसंगी प्राचार्य संजीव गोसावी यांनी संपूर्ण देशाला आजही भारताच्या ‘मिसाईल मॅन’ची आठवण येत आहे. डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत असे बोलत कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला
हॉवरक्राफ्ट कार्यक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद न मिळाल्याने ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) सामील झाले. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अंतराळ रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे त्यांना सामान्यतः “मिसाइल मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाते. संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यात ते देशामागील शक्ती होते.
त्याच्या महान योगदानामुळे आपला देश आण्विक राष्ट्रांच्या गटात आला आहे. ते एक प्रसिद्ध वैज्ञानिक आणि अभियंता होते ज्यांनी २००२ ते २००७ पर्यंत ११ वे राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली. त्यांनी १९९८ च्या पोखरण -२ अणुचाचणीमध्येही भाग घेतला. ते देशाच्या विकासासाठी नेहमीच ध्येय ठेवणारे दूरदृष्टी आणि विचारांचे माणूस होते. अश्या शब्दात उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रसंगी विद्यालात वाचन प्रेरणा दिनानिमित्य विद्यालयाच्या वाचनालयात ग्रंथपाल सचिन धकाते यांच्या उपस्थितीत प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विविध विषयाची पुस्तके वाचून काढली
सम्पूर्ण कार्यक्रमाचे संचालन शंकर दासरवार यांनी केले तर आभार संतोष बोबटे यांनी मानले.
गोंडवाना सैनिकी विद्यालायत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
RELATED ARTICLES