गडचिरोली :- गोंडवाना सैनिकी विद्यालायत आज दिनाक १५ ओक्टोबर रोजी हात धुवा दिन साजरा करण्यात आला हा दिवस आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो या प्रसंगी विद्यालायत प्राचार्य संजीव गोसावी, पर्यवेक्षक अजय वानखेड़े, प्रा. गजानन ढोले, क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी व विज्ञान शिक्षक देवेन्द्र म्हशाखेत्री यांनी विद्यार्थ्याना हात कसे व किती वेळ धुतले पाहिहे याविषयी प्रात्यक्षिक करुण दाखविले.
‘स्वच्छ हात धुवा’ ‘रोगांना दूर ठेवा’ असे बोलत प्राचार्य संजीव गोसावी म्हणाले की आपल्या सभोवतालच्या परिसरात हानीकारक किटाणू असतात आणि हे किटाणू
अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास दुषित पाणी किवा अन्नातून खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच पुढे मेंदू, फुफ्फुस्, यकृताचे दुर्धर आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. तर विज्ञान शिक्षक देवेन्द्र म्हशाखेत्री यांनी विद्यार्थ्याना हात कसे धुतले पाहिजे याविषयी प्रात्यक्षिक करुण दाखविले व हात न धुतल्यामुले होणार्या
रोगांपासून बचाव करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे “स्वच्छ हात धुणे” हे समजावून सांगितले स्वच्छ हात कसे धुवावे? हात धुण्यासाठी साबणाचा वापर करावा. प्रथम हात पाण्याने ओले करुन त्यावर साबण घासावी. दोन बोटांमधील जागा तसेच नखाच्या खालचा भाग व मनगटे घासावी. हात धुण्याची क्रिया कमीत कमी 20 सेकंदापर्येत चालने आवश्यक. हात धुवून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने किंवा टॉवेलने हात पुसावे.
हात कधी धुवावे जेवणाआधी व स्वयंपाकापुर्वी शौचालयाचा वापर केल्यानंतर झाडझूड केल्यानंतर पाळीव प्राणीमात्रांना स्पर्श केल्यानंतर आजारी व्यक्तीच्या भेटीपुर्वी व नंतर बाहेरुन खेळून, फिरुन आल्यानंतर दुसऱ्यांच्या खोकला किंवा शिंकेच्या संपर्कात आल्यानंतर
हात धुण्याला कमी लेखू नका, त्याला आपली सवय बनवा, स्वच्छ हात धुतल्याने तुमचा डॉक्टरकडे जाण्याचा चक्कर, पैसा आणि वेळ वाचू शकते असे मार्गदर्शन त्यानी केले कार्यक्रमाला विद्यालातिल विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
गोंडवाना सैनिकी विद्यालायत हात धुवा दिन साजरा
RELATED ARTICLES