Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedगोंडवाना सैनिकी विद्यालयात सैनीकोत्सव २०२२ चे थाटात उदघाटन

गोंडवाना सैनिकी विद्यालयात सैनीकोत्सव २०२२ चे थाटात उदघाटन

गडचिरोली :- स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सैनीकोत्सव २०२२ चे थाटात उद्घाटन करण्यात आले उदघाटना प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी हे होते तर उद्घाटक तथा ध्वजारोहक म्हणून जिल्हा परिषद गडचिरोलीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार हे होते, प्रमुख अतिथी म्हणून अरविंद कुमार कतलाम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गडचिरोली , खुशाल मस्के तालुका क्रीडा सचिव गडचिरोली,गोंडवाना सैनिकी विद्यायालाचे उपमुख्याध्यपक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी, सैनिकी निदेशक ऋषी वंजारी व नामदेव प्रधान हे होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बलदेवता हनुमानजी यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पूजन करण्यात आले त्यानंतर उद्घाटक राजेंद्र भुयार व प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा ज्योतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यालयाच्या चारही हाऊस च्या कॅडेट्स नि व एन सी सी कॅडेट्स उत्कृष्ट असं क्रीडा पथसंचलन सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली . प्रसंगी क्रीडे मुळे विद्याथ्यांचा सर्वागींण विकास होतो, निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त आणि सहकार्याची भूमिका निर्माण होते, आणि या बळावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो असे मत उद्घाटक राजेंद्र भुयार यांनी केले, क्रीडा क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होतो असेही ते म्हणाले, गोंडवाना सैनिकी विद्यालयाची शिस्त व एकता यांचे कौतुक करीत इथला विद्यार्थी हा नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन जिल्हायाचा नाव लौकिक करायाला पाहिजे असे ते बोलले. व विद्यार्थ्याना खेळ एक संघ भावनेने खेळण्यास सांगितले व सर्वांना शुभेच्छा दिल्या, मैदानी खेळ हे शरीराला स्वस्थ ठेवते तर बौद्धिक खेळ हे बुद्धीला चालना देतात म्हणून सर्व प्रकारचे खेळ हे अगदी आवश्यक आहेत असे मत पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांनी मांडले, प्रत्येकाने निदान एका तरी खेळात आपले वर्चस्व निर्माण करावे व ते सिद्ध करून दाखावावे असे बोलत विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी यांनी काही महिन्यापूर्वी झालेल्या ऑलम्पिक खेळा बद्दल हि सांगितले त्यांनी आवर्जून नीरज चोप्रा यांच्या उदाहरण दिला ऑलम्पिक स्पर्धेत भारताला एकूण २२ ठिकाणी सुवर्ण पदक प्राप्त करता आले यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपणही उत्तम खेळाडू बनावे कारण तळागाळातून हि खेळाडू निर्माण होऊ शकतो फक्त प्रयत्न व जिद्द महतवाची असते असे मत प्राचार्य संजीव गोसावी यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांना क्रीडा व संविधान दिनाच्या शुभेच्छा हि दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संतोष कुळमेथे यांनी, प्रास्ताविक वाचन क्रीडा शिक्षक भूपेंद्र चौधरी यांनी केले तर आभार रविंद्र कोरे यांनी मानले उद्घाटनीय सामना हा चंद्रशेखर आझाद व भगतसिंग हाऊस दरम्यान खेळला गेला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments