मुल (तालुका प्रतिनिधी. ) महाराष्ट्र शासन परिवहन महामंडळाने
सर्व प़कारच्या बसेस मध्ये सुट देऊन
राज्य भरातील महिलांना गुढीपाडव्याच्या शुभपर्वावर ५० टक्के
सुट देऊन खुष केले. गत ४ दिवसांपासून महामंडळाचे बसेस मध्ये
महिलांचा प्रवास वाढला बघायला मिळाले
महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली, घोषणेची अंमलबजावणी सुरू केली. आता चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने सुद्धा परिवहन महामंडळापमाणे ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या महिलांना 50 टक्के सूट देण्याचा घोषणा केली आहे.या घोषणेची त्वरीत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे कळते. आता चंद्रपूर ते गडचिरोली प़वास करणाऱ्या महिलांना यांचा लाभ होणार आहे. महिलांनी चंद्रपूर गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या या घोषणेचे स्वागत केले आहे