Thursday, February 22, 2024
Homeमूलचंद्रपूर मतदार संघात लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे ?

चंद्रपूर मतदार संघात लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे ?

नुकतेच चंद्रपूर लोकसभेचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दुःखद निधन झाले, निधन झाल्यानंतर लागलीच निवडणूक आयोगाने एक पत्र पाठवत पोटनिवडणुकीची चाहूल दिली, अश्यातच चंद्रपूर लोकसभेचे माजी खासदार , माजी केंद्रीय मंत्री तथा मागील निवडणुकीत दुर्दैवाने पराभूत झालेले हंसराज भय्या अहिर यांनी दिल्ली मध्ये अमितजी शहा यांची भेट घेत घडामोडीवर नजर ठेवत चर्चा केली, त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचे वारे वाहायला लागले की काय अश्या चर्चा रंगत आहेत, या भागातील कुणबी समाज व माळी समाज हा नेहमी भाजपच्या पाठीशी राहणारा समाज आहे पण मागील निवडणुकीत काँग्रेसचे बाळु धानोरकर व वंचित आघाडीचे प्रा महाडोळे उभे होते, महाडोळे यांनी 1 लाखाच्या वर मतदान घेत भाजपचा पारंपरिक मतदार दूर केला, त्यामुळे भय्या चा दुर्दैवी पराभव झाला असेच म्हणावे लागेल, मागील साडे चार वर्षांत बरेच पाणी वाहून गेले असून प्रा महाडोळे निवडणुकीनंतर जे गायब झाले तर त्यांचा अजूनही अत्ता पत्ता नाही अशी चर्चा आहे , सध्यातरी प्राथमिक चर्चा असून पुढे काय काय होते याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments