Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedचांदापूर येथे सर्पमित्र तन्मय झीरे यांनी पकडला तेरा फुटाचा अजगर

चांदापूर येथे सर्पमित्र तन्मय झीरे यांनी पकडला तेरा फुटाचा अजगर

मुल तालुक्यातील चांदापूर येथे बंडू कडूकार यांच्या शेतात काम करीत असताना अचानक भलामोठा अजगर दिसला, कडूकार यांनी लागलीच स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप पाल यांना भ्रमणध्वनी वरून याची माहिती दिली,दिलीप पाल यांनी ही माहिती मुल येथील प्राणीमित्र व सर्पमित्र तन्मय झीरे याना कळवताच सदैव अश्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तयार असलेले तन्मय झीरे हे वेदांत निकुरे यांच्या सोबत चांदापूर ला दाखल झाले, तब्बल तेरा फूट इतकी लांबी असलेल्या अजगराला झिरे यांनी पकडुन सुरक्षित स्थळी जंगलात सोडले, या वेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती, इतका मोठा अजगर हा मूल परिसरात पहिल्यांदाच सापडला आहे त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments