Thursday, February 29, 2024
Homeमूलचामोर्शी रोड, मुल-बोरचांदली पुलाजवळ भीषण अपघात, दोन ठार

चामोर्शी रोड, मुल-बोरचांदली पुलाजवळ भीषण अपघात, दोन ठार

चामोर्शी रोड वर बोरचांदली नदी पुला जवळ भीषण अपघात झाला असून दोन युवक जागीच ठार झालेले आहेत, एस टी महामंडळ ची बस आणि दुचाकी दरम्यान हा अपघात घडला, दुचाकी वर असलेले दोन्ही युवक ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे,बस क्रमांक MH07 C 9158 ही मूल वरून चामोर्शी कडे जात असताना विरुद्ध दिशे कडून येणारे दुचाकी स्वार हे अचानक समोर आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला, या अपघातात बस पलटली असून बस मधील काही प्रवासी सुद्धा जखमी आहेत, दुचाकी स्वार संदीप काकोडे आणि गुरनले नामक युवक जागीच ठार झाले, हे दोन्हीही युवक फिसकुटी गावचे असलयाचे समजते, घटनास्थळी बघ्यांची गर्दी असून पोलीस कुमक लागलीच दाखल झाल्याचे समजते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments