ग्रामीण भागातील कणा असलेल्या परंपरा म्हणजे नाटक आणि शंकरपट, मध्ये काही वर्षे शंकरपटावर बंदी होती पण आता सदर बंदी उठली असून ग्रामीण भागात उत्साह संचारला आहे, चिचाला ग्राम अंतर्गत शंकर पटाला सुरुवात झाली असून भाजप नेते , मुल नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांनी फीत कापून उदघाटन केले, माजी नगरसेवक महेंद्र करकाड़े, चीचाला ग्राम चे माजी सरपंच अमोल येलंकीवार यांची विशेष उपस्थिती होती, आजूबाजूच्या ग्रामीण भागात शंकरपट आयोजनामुळे उत्साह संचारला असून ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे, मंडळाचे आयोजक बाळू डोहने , डॉ गुरू भेंडारे तसेच सहकाऱ्यांनी शंकरपटाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन केले असून चाहत्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे