दिनांक २३.०७.२०२४ चंद्रपूर व मुल वरून येणाऱ्या एमएसआरटीसी च्या दोन्ही बसेस एकमेकांना समोरासमोर आदळून भीषण अपघात घडला आहे. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होती की बस समोरून पूर्ण चकणाचुर झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती आहे दोन्ही बसेस खूप जास्त वेगात असल्यामुळे ड्रायव्हर चे नियंत्रण सुटून हा अपघात अडून आला. या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून महामंडळाच्या ड्रायव्हर साहेबाना डोळे उघडे ठेऊन गाडी चालवावी असे बोलू लागले. एका बस मध्ये ३० ते ४० प्रवासी व बस कंडक्टर प्रवास करतात या सगळ्या प्रवाशांचा यमदूत ड्रायव्हर असतो जर या ड्रायव्हर कडून अश्या चुका घडतील तर प्रवाशांचा काय होणार असा प्रश्न नागरिक करू लागले.
एमएसआरटीसी च्या बसेस चे ड्रायवर खूप वेगाने गाड्या चालवत असल्याची तक्रार नेहमीच असते, अश्यातच हा अपघात घडला असल्याची चर्चा आहे