Thursday, October 10, 2024
HomeUncategorizedजंगली हत्तीचा मोर्चा आता इटीयाडोह ते नवेगाव बांध च्या जंगलात

जंगली हत्तीचा मोर्चा आता इटीयाडोह ते नवेगाव बांध च्या जंगलात

छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात दाखल झालेले रानटी हत्ती मुरूमगाव , वडसा, कुरखेडा भागात दाखल झालेत,मागील वर्षी या हतींनी फक्त याच परिसरात डेरा मांडला होता नंतर ते माघारी गेले होतेत, पण या वर्षी सदर परिसरातून भ्रमंती करत करत हे हत्ती आता गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात डेरेदाखल झाले आहेत, सध्या हे हत्ती निसर्ग सौंदर्याने व्याप्त असलेल्या इटीयाडोह ते नवेगाव बांध च्या परिसरात आहेत,
स्थानिक लोकांच्या शेतांची खुंदवळ करीत असल्याने शेतीची नुकसान होत आहे, अश्यातच तालुक्यातील तिडका/पौनी येथील रहिवासी सुरेंद्र कबहिबग एक दुसरा सहकारी घेऊन हत्ती बघायला गेला, अतिआत्मविश्वास करत हत्तींच्या काळपाजवळ गेल्याने हत्तींनी त्याच्यावर आक्रमण करत ठार केले तर दुसऱ्याला जखमी केले
सध्या उत्सुकता म्हणून अनेक बघ्यांची गर्दी होत असली तरी शेतीची नुकसान व मानव जातीवर हल्ले यामुळे परिसरातील जनता चिंताग्रस्त आहे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments