भारत सरकार द्वारे कौशल्य विकास कार्यक्रमाचे माध्यमातून व जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांचे वतीने आज दिनांक १७/०९/२०२२ रोज शनिवारला दुपारी १:०० वाजता जन शिक्षण संस्थान धानोरा रोड गडचिरोली चे सभागृहात सन २०२१ ते २०२२ या कालावधीत जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंघाने विश्वकर्मा दिवसाचे औचित्य साधून प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
त्या कार्यक्रमाला खालील सन्माननीय मार्गदर्शकांनी संबोधन केले.कार्यक्रमाचे उद्घाटक
मा.नियाज मुलानी,प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली.कार्याक्रमाचे अध्यक्ष मा.विजय बाहेकर (अध्यक्ष) जन शिक्षण संस्थान गडचिरोली.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. मारोतराव कोवासे माजी मंत्री तथा माजी खासदार गडचिरोली, मा.देवाजी तोफा सामाजिक कार्यकर्ता लेखा मेंढा गडचिरोली,श्रीमती.प्रीती सोनकुसरे सामाजिक कार्यकर्ता आरमोरी जिल्हा.गडचिरोली,श्रीमती.यामिनी मातेरे सामाजिक कार्यकर्ता वैरागड जिल्हा गडचिरोली,मा .जगदीश हांडेकर प्राध्यापक गडचिरोली,मा.धन्नालाल नगरीकर माजी सभापती बांधकाम विभाग गोंदिया.सदर मान्यवरांच्या मार्गदर्शनात कौशल्य दीक्षांत समारोह पार पाडण्यात आला.
उद्घाटनीय मार्गदर्शनात मा.नियाज मुलानी,प्रकल्प व्यवस्थापक जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेऊन स्वताच्या पायावर उभे राहावे, गावातील गरजा काय आहेत याची माहिती घेऊन स्वयंरोजगार उभा करण्यात यावा,तसेच ग्रामीण पातळीवर इलेक्ट्रिकल ,शिलाई, ब्युटीशियन,कॉम्पुटर,हॅन्ड एम्ब्रॉयडरी,नर्सिंग,बांबू बास्केट,या सर्व कारागिरांची अत्यंत गरज आहे तसेच शासकीय योजनाचा लाभ घेऊन स्वयंरोजगार उभा करावा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात मा.विजय बाहेकर (अध्यक्ष) जन शिक्षण संस्थान गडचिरोली श्रमिक विदयापिठाच्या माध्यमातून केंद्राच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारित कोर्स ची निवड करण्यात आलेली असून ग्रामीण,शहरी व गरीब वस्तीतील वय 15 ते 45 वयोगटातील कमी शिकलेल्या,आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या महिला व पुरुषांसाठी हा कार्यक्रम आहे.जन शिक्षण संस्थांनचे उद्देश /तांत्रिक कौशल्य वृद्धी समाजातील युवकांना शिकण्याची गरज आहे,गाव पातळीवरील महिला बचत गट JLG तयार करून कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करावे असे आव्हान केले तसेच अनेक महापुरुषांचे उदाहरण देऊन कर्तृत्ववान बनावे असे उपस्थितांना आवाहन केले.स्वयंरोजगार उभारतांना कमी दर्जाचे समजू नये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानंतर उपस्थित मार्गदर्शकांच्या हस्ते दीक्षांत समारोह करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री शुभम पिरके कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन श्री गजानन अलोणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कुमारी कांचन कुळमेथे जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री पराग कांबळे व सर्व टीम यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमात २५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
जन शिक्षण संस्थान गडचिरोली तर्फे कौशल्य दीक्षांत समारोह संपन्न
RELATED ARTICLES