गडचिरोली :- स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचिरोली यांनी नुकतेच झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत लसीकरणाची कथा या विषयांतर्गत विज्ञान नाट्य सादर करीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
प्रादेशिक विद्या प्राधिकरण,नागपूर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या वतीने सत्र २०२२-२३ करिता राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा अंतर्गत नुकतेच गडचिरोली येथील भगवंतराव हिंदी हायस्कुल येथे जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्याभरातुन एकूण सात संघ सहभागी झाले होते. त्यात गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या नाट्य संघाने लसीकरणाची कथा या विषयावर उत्तम विज्ञान नाटक सादर करून प्रेक्षकांची माने जिंकीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला, या विज्ञान नाटकात विद्यालयातील कॅडेट मास्टर ऐश्वर्य कचलामी,अनुषं गजभिये, अंशुमन आक्केवार,शुभम कोकणे व श्रीहर्ष बुधबावरे यांनी प्रमुख भूमिका बजावली तर कॅडेट मास्टर अनुराग लेकामी, चेतन आत्राम व अभय दास यांनीही उत्तम भूमिका वठविली.
या संपूर्ण विज्ञान नाटकाचे लेखन व दिग्दर्शन नरेंद्र उंदीरवाडे यांनी केले तर नाटकाची निर्मिती देवेंद्र म्हशाखेत्री यांनी केले, विशेष सहकार्य विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे व पर्यवेक्षक अजय वानखेडे यांचे लाभले,
भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी च्या संस्थाअध्यक्षा भाग्यश्रीताई हलगेकर (आत्राम), सचिव धर्मरावबाबा आत्राम, मार्गदर्शक ऋतुराजजी हलगेकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे व विभागस्तराकरिता शुभेच्छा हि दिल्या आहेत
जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय प्रथम
RELATED ARTICLES