Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedजिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर, विदर्भात दिसणार महिला राज

जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर, विदर्भात दिसणार महिला राज

अनेक दिवसांपासून सर्व राजकीय कार्यकरतांचे डोळे लागून असलेले मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेलं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण आज जाहीर झाले, आरक्षण बघताच अनेक दिगजांचे हिरमोड झालेली असताना अनेकांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत,
चंद्रपूर जिल्ह्याची अध्यक्ष ह्या अनुसूचित जातीच्या महिला राहणार आहेत, आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला आहे त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नेत्यांनी आजपासूनच स्वतःच्या जागी आपल्या सौभाग्यवती ना अध्यक्ष बनवायचे स्वप्न बघणे सुरू केले आहे, गोंदिया जिल्ह्यात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण राहणार असून भंडारा मध्ये अनुसूचित जमाती ची महिला राज्य करणार आहे, विदर्भातील अमरावती जिल्ह्यात सर्वसाधारण महिला हे आरक्षण राहणार आहे, एकंदरीत विदर्भातील जास्तीत जास्त जिल्हा परिषद मध्ये महिला राज दिसणार आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments