Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedझाडीपट्टी कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा रहानार.. सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार

झाडीपट्टी कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा रहानार.. सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार

आज दि.16 सप्टेंबरला राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी चन्द्रपुर येथे कलावंत संघटनेच्या वतीने मुकेश गेडाम यांच्या नेतृत्वात एका शीष्टमंडळाने भेट घेऊन झाडीपट्टी च्या समस्यांचे निवेदन देऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली..
यामध्ये प्रामुख्याने 1)झाडीपट्टीची पंढरी म्हनुन ओळख असलेल्या वडसा येथे दोन हजार आसनसंख्या असलेले नाट्यगृह ऊभारण्यात यावे. 2)महागाईच्या वाढत्या दराचा वीचार करुन जेष्ट कलावंतांच्या मानधनात वाढ करन्यात यावी. 3)नाट्यप्रयोगादरम्यान कलावंतांचा अपघाती अथवा अकस्मात मृत्यु झाल्यास त्यांच्या कुठंबीयांना पाच लाखाची आर्थीक मदत करन्यात यावी. 4)नाट्यकलावंतांना शासनाच्या वतीने वीमाकवच देण्यात यावे. 5)नाटक आयोजक मंडळांचा मनोरंजन कर माफ करन्यात यावे. 6)वडसा येथे झाडीपट्टी रंगभुमीकरीता स्वतंत्र्य रंगभुमी प्रयोग परिनीरीक्षन मंडळ स्थापन करन्यात यावे. 7)गोंडवाना विद्यापिठात स्वतंत्र्य नाट्यशास्त्र वीभाग सुरु करण्यात यावा. 8)शासनाच्या वतीने झाडीपट्टी कलावंत संमेल्लन घेन्यात यावे. 9)झाडीपट्टी कलावंतांसाठी नीशुल्क नाट्य प्रशीक्षण केन्द्र सुरु करण्यात यावे. 10)बाहेरगाववरुन आलेल्या कलावंतांसाठी वडसा येथे नीवासस्थान बांधन्यात यावे. ईत्यादी प्रमुख मागन्यांसह झाडीपट्टीच्या अनेक वीषयावर मंत्री महोदयांसोबत चर्चा करण्यात आली..यावेळी मा.मंत्रीमहोदयांनी वरील मुद्दे हे अत्यंत महत्वाचे असुन यावर मी प्रामुख्याने पाठपुरावा करेन तसेच झाडीपट्टीच्या कलावंतांच्या पाठीशी मी व शासन खंबीरपने ऊभा राहीन असे आश्वासन दिले..
मुकेश गेडाम यांच्या नेतृत्वातील शीष्टमंडळात झाडीपट्टीचे कलावंत राहुल पेंढारकर, पंकेश मडावी, वीक्की गायकवाड, चारुदत्त झाडे, लालु पेंदाम, संगीता भसारकर, नंदीनी दुर्गे, सारिका ऊराडे, टीना ऊराडे आदींसह ईतर कलावंत ऊपस्थीत होते..
मंत्री महोदयांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेने कलावंतांनी समाधान व्यक्त केले..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments