तहसील कार्यालय गडचिरोली च्या वतीने जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून दिनांक 13 ऑक्टोबर ला शालेय विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, सदर स्पर्धेत गडचिरोली शहरातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला,
आपत्ती निवारण व त्यावरील उपाय या विषयावर स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेत पहिल्या तिन्ही क्रमांकाचे मानकरी हे गोंडवाना सैनिक विद्यालय, गडचिरोली चे विद्यार्थी ठरले, प्रथम क्रमांक संदेश कृष्णा मडावी, द्वितीय हर्षल जयराम जागीं तर तृतीय क्रमांक साहिल विजय पोटावी यांनी पटकावला, विजेत्या स्पर्धकांना गडचिरोली तहसीलदार श्री महेंद्र गणवीर यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच शिक्षक वृंदानी केले आहे
तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे आयोजित निबंध स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय अव्वल
RELATED ARTICLES