नवयुवक तान्हा पोळा समिती मुल तर्फे आयोजित कार्यक्रमात येणाऱ्या 15 सप्टेंबर 2023 ला टीव्ही कलाकार प्रतीक्षा शिवणकर येणार आहे, जिव्हाची होतीया काहिली या सिरीयल मध्ये काम करणारी टीव्ही कलाकार प्रतीक्षा शिवणकर ही तान्हा पोळा कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने संपूर्ण मुल वासीयांत आनंदाचे वातावरण आहे, दरवर्षी नवयुवक तान्हा पोळ्या चे आयोजन हे मंडळातर्फे चंद्रपूर रोड वरील रोडच्या कडेला केले जाते, दरवर्षी वाढता प्रतिसाद बघता या वर्षी मंडळाने उपस्थितांचा उत्साह वाढवण्यासाठी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर ला पाचारण केले आहे, तान्हा पोला स्पर्धा ही मोठा नंदी, लहान नंदी आणि वेशभूषा या तीन गटात होणार आहे, प्रत्येक गटात तीन बक्षिसे अनुक्रमे रोख रु पाच हजार, तीन हजार व दोन हजार विविध मान्यवरांच्या सौजन्याने देण्यात येईल, तसेच काही उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रत्येक सहभागी सदस्याला पण बक्षिसे देण्यात येणार आहे, मुल शहर वासीयांनी अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर हिच्या स्वागताला व तान्हा पोळा स्पर्धा बघण्याचा आनंद घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे