हिंदू धर्मात अनेक चाली रीती आहेत, त्या सर्व चाली रीती ह्या विज्ञानाला धरून आहेत, आपल्या पूर्वजांनी त्या जपून ठेवल्या आहेत आता येणाऱ्या प्रत्येक पिढीनी त्या जपणे हे आपले कर्तव्य आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक चालीरीती कालबाह्य होतांनी दिसत आहे पण आजही अनेक लोक सर्व सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात, सध्या सगळीकडे कार्तिक मध्ये तुळशी विवाह करताना दिसत आहे, सर्वात जास्त प्राण वायू देणारी वनस्पती म्हणजे तुळसी, प्रत्येक दारात तुळस असली म्हणजे त्या घरी प्राण वायू भेटणार मग तिला आपल्या पूर्वजांनि तिला देवाचं स्वरूप देत तिला जगण्याच्या उद्देशाने रोज पाणी टाकायची प्रथा पाडली,
गडचिरोली शहरात असाच एक आगळावेगळा तुळसी विवाह पार पडला तो रेड्डी गोडाउन परिसरात, भारत संचार निगम लिमिटेड चे कर्मचारी शंकरराव माकडे यांच्या कुटुंबीयांनी तुळसी ला सोळा शृंगारांनी सजवत अतिशय थाटामाटात सामूहिक रित्या तुळसी विवाह साजरा केला, चालीरीती, परंपरा जपण्यासाठी माकडे परिवाराने घेतलेला हा पुढाकार परिसरात कौतुकाचा विषय असून सर्वत्र कौतुक होत आहे, या शुभ प्रसंगी शंकरराव माकडे यांचे समवेत श्री.मनोज बुधबावरे,बालपाडें साहेब,हिरालाल राऊत,मडावी साहेब,अशोक जुवारे,भडागें साहेब अनुराग माकडे, गौरव कावळे,वाढंरे साहेब मोगरकर दादा,गोनाडें साहेब, वाकेकर साहेब,नंदुभाऊ कुमरे, गोलू राऊत, जिग्गी भाऊ,
सौ.छाया राऊत, कुदां माकडे, माधरी मैंद,मंदाताई जुवारे,बुधबावरे मँडम,वंदुबाई जुवारे, प्रणीता माकडे.
या सर्व पाहुण्याची उपस्थिती होती.
तुळशी विवाह सोळा शृंगारांनी सजवत अनोख्या पध्दतीने साजरा, शंकर माकडे यांचा उपक्रम
RELATED ARTICLES