स्वर्गीय गोविंदरावजी मुंनघाटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षण मिळावे ही संकल्पना ठेवत 1972 रोजी गडचिरोली जिल्ह्यात दंडकारण्य शिक्षण संस्था ची स्थापना केली, हे वर्ष या संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, मागील 50 वर्षात या संस्थेने अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना घडवत आदर्श निर्माण केलेला आहे, स्वर्गीय गोविंदरावजी मूनघाटे व स्वर्गीय कमलताई मूनघाटे यांनी लावलेल्या छोटयाशा रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झालेले आहे, विद्यालये, महाविद्यालय, वाचनालय अश्या अनेक फांद्या आज दंडकारण्यात पसरल्या आहेत आणि त्यांचा दुगंध सर्वत्र दरवळत आहे, अश्या या संस्थेचा सुवर्ण महोत्सव मागील वर्षभर साजरा करण्यात आला असून येणाऱ्या 12 जानेवारी ला याची एक समारोहाद्वारे सांगता होत आहे, गडचिरोली येथील विद्याभारती कन्या विद्यालयात दुपारी 1 वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे, महाराष्ट्र भूषण डॉ अभय बंग हे या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी राहणार असून मुंबई येथील जेष्ठ विचारवंत तथा महाराष्ट्र राज्याच्या संस्कृती व साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे, शिक्षणतज्ञ श्री हेरंब कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे, या प्रसंगी लेखक अनिल मूनघाटे यांचा आल्हाद काळ, डॉ नंदकुमार मोरे यांनी संपादित केलेल्या शोध काटेममुंडरीचा तसेच स्मरणिका दंडकारण्य वृक्ष कांचन या लेख साहित्याचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, सदर समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य राजुभाऊ मूनघाटे यांनी सुवर्ण महोत्सव समारंभ समिती आणि दंडकारण्य परिवार गडचिरोली यांच्या वतीने केले आहे
दंडकारण्य शिक्षण संस्थेचा सुवर्ण महोत्सव सांगता समारोह 12 जानेवारीला
RELATED ARTICLES