राष्ट्रवादी पक्षाचे चंद्रपूर शहराचे महासचिव आणि शरद पवार विचार मंचचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.धनंजय दानव यांचे आज दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी हृदय विकाराच्या आणि पक्षाघात( पॅरालेसीस) झटक्याने निधन झाले. मागील 4,5 दिवसांपासून ते प्रकुर्ती अस्वस्थेमुळे रुग्णालयात भरती होते, शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित होत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ साथीदार म्हणून अनेक दिवस काम केले, त्यांच्या पश्चात पत्नी रेखाताई, मुलगी व मुलगा आहे, त्यांच्या निधनाने चंद्रपूर शहरात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, आज दिनांक 6 फेब्रुवारी ला सायंकाळी 5 वाजता बिनबा गेट येथील शांतिधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले