मुल शहरातील प्रतिष्ठित व्यापारी हिरेन गोगरी यांच्या सौभाग्यवती हीना गोगरी यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली, त्यांनी नागपूर येथील किंगस रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला, मागील वर्षी आगस्ट महिन्यात त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते, हैदराबाद येथील रुग्णालयात तब्बल पाच महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली, पती हिरेन गोगरी यांनी शक्य ते संपूर्ण प्रयत्न केले , शेवटपर्यंत त्यांनी आपल्या जीवनसांगिनी साठी संपूर्ण शर्थीचे प्रयत्न केले , पण आज दिनांक 03 फेब्रुवारी 2023 ला त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या मागे सासूबाई, पती हिरेन गोगरी, मुले योग व निर आणि प्रचंड मोठा आप्त परिवार आहे, हीना गोगरी यांच्या निधनाने एक हसमुख, मनमिळाऊ व्यक्तिमत्व नेहमीसाठी लोप पावले असून शहरात शोककळा पसरली आहे, स्वर्गीय हीना गोगरी यांचे अंत्यसंस्कार मुल येथील उमा नदी घाटावर दिनांक 04 फेब्रुवारी ला सकाळी 11 वाजता होईल,