भारत संचार निगम लिमिटेड च्या कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था असलेल्या दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर ची 53 वी आमसभा आज E 10 B एक्सचेंज सभागृहात संपन्न झाली,सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वासुदेवजी आस्कर होते, सभेचे सूत्रसंचालन संस्थासचिव रवी येणारकर यांनी केले, मागील सभेचे इतिवृत्त वाचन , इमिनीटी लोण ची मर्यादा वाढवणे, मागील वर्ष जमा खर्च मान्यता, पुढील वर्षाच्या खर्चाची मान्यता, आलेल्या अर्जातून ऑडिटर ची निवड अशे विविध ठराव घेण्यात आले, मागील संचालक मंडळाने निवडुणुकीला वेळ झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्त नंतरही अतिशय चांगल्या रीतीने संस्था सांभाळत उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांच्या अभिननंदनाचा ठरावही घेण्यात आला, सभेला मोठ्या संख्येने सभासदांची उपस्थिती होती, सभेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष वासुदेव आस्कर, सचिव रवी येणारकर, कोषाध्यक्ष ललित देव , संचालक किशोर कापगते, एस पी जयस्वाल, सी पी दलाल, एच एस गुप्ता यांचेसह सर्व सभासदांनी विशेष प्रयत्न केले, सदर पतसंस्था ही चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचारी सदस्य असल्याने दोन्ही जिल्ह्यातील कर्मचारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 53 वी आमसभा संपन्न
RELATED ARTICLES