दूरसंचार कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर ही पतसंस्था चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील भारत संचार निगम लिमिटेड च्या कर्मचाऱ्यांची पतसंस्था असून नुकतीच चंद्रपूर येथील संस्थेच्या कार्यालयात नवीन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली, त्यापूर्वी संपूर्ण अकराही संचालकांची निवड ही अविरोध झाली होती, अपेक्षेप्रमाणे पदाधिकाऱयांची निवड सुद्धा अविरोध होत संचालकांनी एक आदर्श घालून दिला आहे,प्रशांतजी गाडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर नरेंद्र पिंपळकर सहकार बोर्डचे शिक्षण अधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये सदर निवड करण्यात आली, सुधीर पिसे यांची अध्यक्ष म्हणून तर विजय शिंदे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे संदीप हरने यांची उपाध्यक्ष म्हणून तर श्रीमती ललिता गजपुरे यांची कोषाध्यक्ष म्हणून अविरोध निवड झाली, सभेला संचालक सर्वश्री किशोर कापगते,आरिफ शेख, निलेश निबरड, निलेश कटकंमवार, अभिजीत जीवने, देविदास कोल्हे, श्रीमती शहनाझ शेख यांची उपस्थिती होती, नवनियुक्त पदाधिकारी व संचालक यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे