नुकतेच काही दिवसांपूर्वी नगर परिषद मूलचे माजी उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे हे मुंबईला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे गेले असता तिथे प्रसिद्ध फिल्म अभिनेते जॅकी श्रॉफ यांची भेट झाली होती, सोशल मीडियावर फोटो आल्यानंतर अनेकांनी लाईक देत या भेटीचे स्वागत केले होते, सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राज्याचे सांस्कृतिक मंत्री असल्याने त्यांच्या कडे अनेक फिल्म अभिनेते, अभिनेत्री, टेलिव्हिजन कलाकार यांची ये जा असते , दोन दिवसांपूर्वी नंदुभाऊ रणदिवे हे सुधीरभाऊं कडे कामानिमित्त गेले असता त्यांना भाऊनसोबत हॉटेल ताज येथे फिल्म कलाकारांच्या बैठकीला जाण्याचा योग आला, तिथे त्याना टायगर श्रॉफ यांची भेट झाली, अर्थातच फोटो शूट झाले , नंदुभाऊ नि त्यांना ताडोबाला भेट देण्याचे आमंत्रण दिले , टायगर श्रॉफ यांनी पण तेथे येण्याची खूप इच्छा असून लवकरच तिकडे भेट देणार असल्याचे सांगितले, जॅकी श्रॉफ यांच्या पाटोपाट टायगर श्रॉफ यांची भेट झाल्यानंतर श्रॉफ कुटुंबीय यांच्या ताडोबा भेटीसाठी उत्कंठा सुरू झाली आहे