माझी वसुंधरा ३.० अभियानंतर्गत नगर परिषद मुल तर्फे आज वृक्ष लागवड, माती वाचवा व संवर्धन, सायकल चा वापर करून प्रदूषण मुक्त शहर करणे करिता 12 राज्य सायकल ने प्रवास करणारे श्री. प्रदीपकुमार उत्तरप्रदेश,प्रणाली चिकटे वणी यवतमाळ,तसेच प्रितेश जीवने हे मुल ला आले होते. त्यांच्या हस्ते चंद्रपूर रोड येथे वृक्ष लावून स्वागत करण्यात आले तसेच नगर परिषद सभागृहात सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील प्रवासाकरीता शुभेच्छा देण्यात आले या सर्व कार्यक्रम करीतामाजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे व नगर परिषद मूल पर्यावरण दूत राहुल आगडे ,नगर परिषद मुल मधील श्रीकांत समर्थ स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता,अभय चेपूरवार आरोग्य निरीक्षक,विनोद येनूरकर ऑफिस सुप्रीडेंटन,प्रतिक डोंगे विद्युत अभियंता व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते
नगर परिषद मुल तर्फे पर्यावरणाचा संदेश घेऊन निघालेल्या सायकल पटूनचा सत्कार
RELATED ARTICLES