Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedनवतरुण रोहित संग्रामे याने केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या पॅनल चा सफाया

नवतरुण रोहित संग्रामे याने केला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या पॅनल चा सफाया

राज्यात सत्तांतर झाले आणि नवीन भाजप – सेना सरकारने ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणुका जाहीर केल्या, राज्यात सरविकडे ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली, भंडारा जिल्ह्यातील सिरेगावटोला हे राजकीय दृष्ट्या मागील अनेक दिवसांपासून अति संवेदनशील गाव, एकेकाळी भाजप चा गड समजला जाणारा हा गाव, पण मध्ये आपल्या राजकीय सोयीसाठी काही विघनसंतोषी राज्यकर्त्यांनी गावात समाजा समाजा मध्ये भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजून घेतली, पण काही दिवसातच स्थानिक गावकऱ्यांना राजकारण लक्षात आलं आणि आपसातील भांडण मिटवत गावकरी एक झाले,
काल पार पडलेल्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत फक्त 24 वर्षाच्या रोहित संग्रामे या नवतरुणाने आपल्या विरोधी पॅनलला चारी मुंड्या चित केले, हे गाव काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात तसेच त्यांच्या निर्वाचन क्षेत्रात येत असून विरोधी पॅनल ला त्यांचाच आशीर्वाद असल्याचे बोलले जाते, पण रोहित संग्रामे यांनी गावकरी, गावातील जुने कार्यकर्ते, नवीन तरुण सर्वांची मोट बांधत स्वता तर थेट सरपंच म्हणून विजयश्री खेचून आणली पण सोबत सहाही सदस्य निवडून आनले व एक आदर्श निर्माण केला, या विजयाची जिल्हाभर चर्चा असून सर्वत्र अभिनंदन होत आहे, विजयाबद्दल सर्वश्री शिशुपाल लंजे… माजी आदर्श सरपंच शामराव संग्रामे., होमराज चाचेरे, अनिल बाळबूधे, मंगेश कापगते, सुभाष मेश्राम, परशराम चचाने व संपूर्ण गावकरयांनी विशेष अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments