Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedनवनिर्वाचित सिनेट सदस्य यश बांगडे यांचा मुल अभाविप कडून सत्कार

नवनिर्वाचित सिनेट सदस्य यश बांगडे यांचा मुल अभाविप कडून सत्कार

नुकतीच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची सिनेट निवडणूक पार पडली, नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातील खुल्या प्रवर्गातून चंद्रपूर येथील युवा अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते यश बांगडे यांनी यश संपादित करत विजयश्री खेचून आणली, संपूर्ण जिल्ह्यातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत करत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली, परिणामी अभाविप ला यश संपादन करता आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार प्रकट करण्यासाठी यश बांगडे हे वयक्तिक सर्वांच्या भेटी घेत आहेत, आज ते मुल येथे आभार प्रदर्शनासाठी आले असता त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. मुल नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे,प्रविनजी मोहूर्ले, प्रा डॉ किरण कापगते- बोरकर, महेंद्रजी करकाड़े, किशोर कापगते,संजय मारकवार तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, धावत्या दौऱ्यात यश बांगडे यांनी इतर सर्वांचे भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत आभार प्रगट केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments