शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित नवभारत विद्यालय मुल येथे आज दि.८/०२/२०२३रोज बुधवारला येथील गाईड शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली गाईड पथकांनी *मुरमुरा चिवडा* तयार करून खरीमाई हा उपक्रम केला..
विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचे शिक्षण देण्यासाठी सदर उपक्रम सारखे उपक्रम राबविण्यात येत असतात.अश्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने वस्तू बनविण्यासाठी आत्मविश्वास तयार होत असते,सदर उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.एच झाडे सर, शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती राजमलवार मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते…सर्वांनी रुचकर अश्या मुरमुरा चिवड्याचा मनमुराद आनंद लुटला… अतिशय आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला….?