?निरोप व सत्कार समारंभ…………….. आज दि.24/08/2022 ला नवभारत विद्यालय मुल येथे श्री. सुरेश उरकुडे सर यांचा समायोजनपर निरोप व सत्कार समारंभ शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक/ प्राचार्य सन्मा. अशोक झाडे सर, प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती राजमलवार मॅडम पर्यवेक्षिका, सत्कार मूर्ती श्री एस एन उरकुडे सर होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुंडरे सर यांनी केले. त्यानंतर श्री. डांगरे सर, सौ भांडारकर मॅडम, श्री निखारे सर, श्रीमती राजमलवार मॅडम यांनी त्यांच्या शालेय कामातील तळमळ, जिद्द, मेहनत, शिस्त, त्यांच्या कामातील पद्धतशिरपणा यावरून बरेच काही शिकण्यासारखे आहे असे सांगितले. उरकुडे सर हे 2014 पासून या संस्थेत कार्यरत होते ते आज आपल्या मूळ आस्थापनेत जात आहे त्यानिमित्त त्यांचा समायोजनपर निरोप कार्यक्रम पार पडला. अध्यक्षीय भाषणात श्री. झाडे सर यांनी त्यांनी केलेल्या शालेय कामकाजाची प्रशंसा केली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री निमसरकार सर तर आभारप्रदर्शन श्री. सुनील चौधरी सर यांनी केले.