आपण ज्या शाळेत इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले त्या शाळेप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करता यावा, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करावे या उद्देशाने प्रेरित होऊन नवभारत शाळेत इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन 1992 मध्ये 10 विची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नवभारत शाळेतील माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी सन
2022- 23 या शैक्षणिक सत्रात गुणवत्ता यादीत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी साठी सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 15.07.2023 रोज शनिवारला ठीक 12.30 वाजता नवभारत कन्या विद्यालय,मूल येथे बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंगी कार्यक्रमाचे अध्यक्षिय स्थान सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मान.मंगलाताई सुंकरवार मॅडम नवभारत कन्या विद्यालय,मूल बक्षीस वितरकाचे स्थान नवभारत कन्या विद्यालय, मूल येथील मुख्याध्यापिका मान.अलकाताई राजमलवार मॅडम यांनी,तर प्रमुख अतिथीचे स्थान नवभारत विद्यालय मूल येथील ज्येष्ठ शिक्षक रमेश डांगरे सर,से.नि.शिक्षक सुपणार सर,नवभारत कन्या विद्यालय, मूल येथील बारसागडे सर,विजय सिद्धावार सर, देवाडे सर,बेलसरे मॅडम,येरमे मॅडम तसेच से.नि.अशोक येरमे सर तसेच उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षकांनी स्वीकारले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या आणि माजी विद्यार्थ्यांचे हस्ते सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका मंगलाताई सुंकरवार मॅडम, सुपनार सर,अशोक येरमे सर यांचा त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करताना शाल आणि पुष्गुच्छ देऊन सत्कार केला.तसेच हैदराबाद येथे शास्त्रज्ञ असलेले 1992 चे माजी विद्यार्थी संजय ढगे याचा सुद्धा स्मृतिचिन्ह,शाल आणि पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गुणवत्ता यादीत शाळेतून प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याना कार्यक्रमाच्या बक्षीस वितरक नवभारत कन्या शाळा,मूल येथील मुख्याध्यापिका मान.अल्काताई राजमलवार मॅडम यांचे शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत
1)सक्षम अशोक गगपल्लिवार प्रथम क्रमांक
2) पियूष दिलीप वाढणकर द्वितीय क्रमांक.(नवभारत विद्यालय मूल (मुले)
1) प्राची प्रकाश पंधरे
प्रथम क्रमांक
2) सलोनी अमोल गुलभमवार
द्वितीय क्रमांक (नवभारत कन्या विद्यालय मूल) या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी त्यांच्या पालकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून या माजी विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घ्यावी आणि जीवनात यशाचे शिखर गाठावे असे मौलिक मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला दोन्ही शाळेतील नववी आणि दहावीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दहावी नंतर ची दिशा ठरविण्यासाठी करिअर गाईडन्स हैद्राबाद येथील माजी विद्यार्थि शास्त्रज्ञ संजय ढगे यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या विज्ञानाशी संबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली. आणि चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बल्लावार यांनी,प्रास्ताविक संदीप धाबेकर यांनी तर आभार प्रदर्शन हितेंद्र कोकाटे यांनी केले. या सोहळ्याला माजी विद्यार्थी विद्यार्थिनी म्हणून विपिन दहिकर, अनिल येत्ते,अजय पोटे ,मनीष शर्मा,नितीन
टहलियानी,नितेश चिलके,प्रमोद सहारे,सतीश राजुरवार,संदिप धाबेकर, प्रशांत नंदिग्रामवार,धर्मा सुत्रपवार,मनीषा भालेराव, किरण चौधरी,संगीता चिताडे,अर्चना तरेकर,सुषमा नोकरकर, तसेच आभासी माध्यमातून सर्वच माजी विद्यार्थ्यानी विशेष परिश्रम घेतले. या कार्यात नवभारत विद्यालय मूल,कन्या विद्यालय , मूल शाळेतील कार्यरत सर्वच शिक्षक शिक्षिका यांचे तसेच सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.