मुल येथील नाग विदर्भ चरखा संघ च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली, सोबतच गांधी जयंती निमित्त खादी कापड खरेदीसाठी 20 टक्के सवलत साठी उदघाटन संपन्न झाले, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला खादी ची लाठी टाकत उपस्थितांनी अभिवादन केले, प्रसंगी चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड चे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते यांच्या हस्ते विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले, प्रसंगी खादी ग्रामोद्योग केंद्राचे बंडू भडके, प्रा मारोती पुलावार, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, मोतीराम वाघमारे, प्रकाश दुपल्लीवार, बनकरजी यांची विशेष उपस्थिती होती, प्रसंगी आज दिवसभर असलेल्या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांनी केले